Pimpri : प्रभातफेरी अन् पथनाट्याद्वारे दिला प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनाचा संदेश

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आरोग्य हीच सेवा मोहिमे अंतर्गत आयोजन

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत शहरात प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनासाठी रविवारी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू कन्याशाळा क्र. २ च्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करून प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनाचा संदेश दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आरोग्य हीच सेवा मोहिमे अंतर्गत प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलन आणि जनजागृतीसाठी प्रभातफेरीसह पथनाट्याचे आयोजन केले होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलन आणि जनजागृतीपर विविध उपक्रम घेण्याचे निर्देश दिले असून त्याअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.