Pimpri : साई चौकात मोबाईल दुकानाला आग; ऍक्सेसरीज जळून खाक

एमपीसी न्यूज – पिंपरी मार्केटमधील साई चौकात मोबाईल दुकानाला आग लागली. यामध्ये एका मोबाईल दुकानातील सर्व मोबाईल ऍक्सेसरीज जळून खाक झाली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रमेश चंदानी यांनी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अग्निशमन विभागाला साई चौकातील मोबाईल दुकानाला आग लागल्याची माहिती दिली.

  • त्यानुसार वल्लभनगर, भोसरी, प्राधिकरण, तळवडे अग्निशमन विभागाचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. साई चौकातील आनंद मोबाईल मार्केट येथे वरच्या मजल्यावर एका मोबाईल दुकानाला आग लागली होती. दुकानाच्या खालच्या बाजूला आणखी चार मोबाईल दुकान आहेत.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे आग पसरली नाही. खालच्या बाजूला असलेली चार दुकाने सुरक्षित राहिली. मात्र, सुनील पंजाबी यांच्या दुकानातील सर्व मोबाईल ऍक्सेसरी जळून खाक झाली.

  • उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे, फायरमन सरोष फुंडे, निळकंठ दुबे, संदीप जगताप, महेंद्र पाटील, प्रतीक कांबळे, अमोल खंदारे यांसह एकूण 20 कर्मचा-यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.