BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : काळेवाडीत शुक्रवारी एक दिवसीय साहित्ययात्री संमेलन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 16 ऑगस्ट) काळेवाडीतील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय येथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत एक दिवसीय साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनात औक्षण, ग्रंथतुला झाल्यावर शिवाजी मराठा शिक्षण परिषदेचे चेअरमन अॅड. भगवानराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कीर्तनकार ह.भ.प. सुचेता गटणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. अमृतमंथन, मानपत्र प्रदान या विशेष सोहळ्यासह अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते ‘घनु अमृताचा’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल.

  • यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, राजेंद्र कोरे, माजी नगरसेवक सुरेश नढे आणि सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन सुनील डोबाळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

उद्घाटन सत्रानंतर प्रा. तुकाराम पाटील यांच्या निवडक कविता, गझलांचे सादरीकरण आणि कथेचे अभिवाचन करण्यात येईल, त्यात शहरातील साहित्यिक आणि रंगकर्मी सहभागी होणार आहेत. प्रा. पाटील यांच्या साहित्यिक सहकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

  • साहित्ययात्री संमेलनाचा समारोप अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. विनाशुल्क असलेल्या या संमेलनाचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतमहोत्सव संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष राज अहेरराव, उपाध्यक्ष सुरेश कंक, राजेंद्र घावटे आणि मंगला पाटील यांनी केले आहे.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement