BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्‍तीचा मृत्यू

0

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) सायंकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्‍तीचे वय अंदाजे 32 असून उंची पाच फूट पाच इंच आहे. अंगाने सडपातळ, वर्ण निमगोरा, टक्‍कल केलेले, अंगात निळी जिन्स आणि निळा फूल बाह्यांचा शर्ट घातला आहे.

मयत व्यक्‍तीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर ‘एन’ तर डाव्या हातावर ‘एम’ अक्षर गोंदलेले आहे. या व्यक्‍तीबाबत माहिती असल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

.