Pimpri : महाराष्ट्राच्या डेअरी उद्योगाला जागतिक ओळख मिळवून देणे हीच काकासाहेबांना खरी श्रद्धांजली -अजित पवार

एमपीसी न्यूज – ‘चितळे डेअरी’च्या माध्यमातून महाराष्ट्राचा तसेच महाराष्ट्रातील डेअरी उद्योगाचा लौकिक वाढविणारे दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या डेअरी उद्योगाला जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देणं, हीच काकासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत त्यांनी काकासाहेबांना आदरांजली वाहिली.

स्वर्गीय बाबासाहेबांनी ‘चितळे डेअरी’ची स्थापना केली परंतु तिला अत्याधुनिक बनवण्याचे श्रेय काकासाहेबांना जातं. दूरदृष्टी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि तरुण पिढीवरील विश्वास हे काकासाहेबांचे वैशिष्ट्य होते. काकासाहेबांची दूरदृष्टी व कार्य हे नवउद्योजक आणि तरुण पिढीला नेहमीच मार्गदर्शन करीत राहील, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.