Pimpri : अन् पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या सामाजिक संस्था

एमपीसी न्यूज – मावळ, मुळशी परसिरता पवसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. सुमारे सात हजारपेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भाटनगर, संजय गांधीनगर पिंपरी, या पूरग्रस्तांना पिंपरीतील सामाजिक संस्थांनी ही खारीचा वाटा उचलला आहे.

पिंपरीतील अमृत व्हेला व गुरुद्वारा संतबाबा मूलसिंग यांच्या वतीने रविवारी (दि.४) आणि सोमवारी (दि. ५ ऑगस्टला) गुरुनानक यांचा प्रसाद म्हणून अन्नदान वाटप करण्यात आले.

  • या मदतीमध्ये अमृतवेला ट्रस्टचे मुकेश फेरवानी, महेश खटवानी, नरेश नेबोवानी, चिराग बोरा या युवकांनी मदतीचा हात पुढे करुन माणुसकीचे दर्शन घडविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.