Pimpri: कोरोनाविरोधातील लढाईसाठी 3 उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहाय्यक संचालकांची टीम पालिकेच्या मदतीला

Pimpri: A team of three Deputy Collectors, Tehsildars and Assistant Directors to fight against Corona with municipal corporation शहरातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका कार्यक्षेत्रातील शासकीय, खासगी रुग्णालयाच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी पालिकेच्या मदतीला तीन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक सहाय्यक संचालक आणि दोन सहाय्यक निबंधकांची टीम जिल्हाधिका-यांकडून देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्याकडे कामाची विभागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर कामकाज करण्यात येत आहे. शहरातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका कार्यक्षेत्रातील शासकीय, खासगी रुग्णालयाच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संक्रमित झालेल्या रुग्णांचा वाढता संक्रमणाचा धोका विचारात घेऊन तीन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक सहाय्यक संचालक आणि दोन सहाय्यक निबंधकांची पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अधिपत्याखाली कामकाज करण्यासाठी नियुक्ती केली आहे.

त्यापैकी पालिकेत रुजू झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्याकडे ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, पीसीएनटीडीएच्याच उपजिल्हाधिकारी करमकर यांच्याकडे ‘अ’ व ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडी)च्या तहसीलदार गीता दळवी यांच्याकडे ‘ह’ व ‘क’ क्षेत्रीय कार्यालये

सहकारी संस्थेतील सहाय्यक निबंधक प्रवीण निनावे यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालये आणि सहाय्यक निबंधक बी.आर.माळी यांच्याकडे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत सर्व पालिकेच्या रुग्णालयातील स्वॅब टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोविड केअर सेंटर (सीसीसी) इत्यादी कामकाजामध्ये रुग्णालय प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

या अधिका-यांनी कामकाजाचा दैनंदिन अहवाल अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना सादर करायचा आहे. तर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे तहसीलदार सुनील बेल्हेकर यांच्याकडे पालिकेच्या कोविड 19 वॉर रुमचे कामकाज देण्यात आले आहे. बेल्हेकर यांनी अतिरिक्त आयुक्त पाटील यांच्या सूचनेप्रमाणे कामकाज करायचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.