Pimpri: ‘निसर्ग संवर्धन काळाची गरज’ यावर दोन मिनिटांची व्हिडिओ स्वरुपात स्पर्धा

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुरस्कृत आणि आई निर्मिती संस्थेतर्फे निसर्ग संवर्धन काळाची गरज या विषयांतर्गत 2 मिनटांची व्हिडिओ स्वरूपात स्पर्धा आयोजित केली आहे. 15 वर्षा खालील बालमित्रांसाठी (मुले/मुली) ही वक्तृत्व स्पर्धा आहे. इच्छुकांनी मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतील व्हिडीओ 9226789883 या व्हॉट्सॲपवर किंवा [email protected] या मेलवर 20 एप्रिल पर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेते व निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांच्या बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद या संकल्पने अंतर्गत ही स्पर्धा घेण्यात येत आहे. 15 वर्षा खालील बालमित्रांसाठी (मुले/मुली) वक्तृत्व स्पर्धा आहे.

“निसर्ग आपला नातेवाईक आहे. त्याला सोडून आपण जे काही करत आहोत. त्याचेच परिणाम आपण कोरोना जन्य परीस्थितीतुन भोगत आहोत. बालमित्रांनो निसर्ग संवर्धनासाठी, निसर्ग आपला नातेवाईक मानुन स्पर्धेसाठी आपल्या कलाकृती पाठवा” असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.

कवीता, नाटक, गीत, निबंध, विनोद यापैकी कोणत्याही एका प्रकारात आपल्या कलाकृती 9226789883 या नंबरवर व्हॉट्सॲपवर किंवा [email protected] या मेलवर पाठवू शकता.

20 एप्रिलपर्यंत व्हिडीओ पाठवाव. अटी व नियमांसाठी वरील दिलेल्या नंबरवर किंवा मेलवर चौकशी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.