Pimpri : अंगठी चोरून महिलेचा केला विनयभंग

एमपीसी न्यूज : पिंपरीतील (Pimpri) महिलेचा विनयभंग 16 जूनला वाय. सी. एम हॉस्पिटल शेजारी शनिवार मंदिराजवळ दुपारी 3.30 वा करण्यात आला. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. जावेद शेख (वय 23 वर्षे, निलंगा, जिल्हा लातूर) हा आरोपी असून त्याचा शोध पोलिस घेत आहे.
फिर्यादी घरी जात असताना समोर आरोपी उभा होता. त्याला दुर्लक्ष करून फिर्यादी पुढे जात होती. तितक्यात आरोपीने ”तू माझ्याशी बोलत का नाही? असे म्हणून तिचा उजवा हात पिरगळला व त्या हातातील 3 ग्राम सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत 4,000 रुपये) जबरदस्तीने चोरून नेली व तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी आरोपी विरोधात (Pimpri) भा. द. वि. कलम 392, 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.