Pimpri : गाडीला कट मारत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – गाडीवरून जात ( Pimpri ) असताना तरुणाला गाडीला कट मारत विनाकारण बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.11) रात्री पिंपरीतील रिव्हर रोड येथे घडली आहे.

याप्रकरणी ऋषभ बापू भोगी (वय 19 रा पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पिंपरी पोलीसानी सनी प्रधान किशोर प्रधान मोन्या शिंदे सर्व राहणार पिंपरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : लोहगड व विसापूर किल्ल्यावर अखंड श्रावणी सोमवार अभिषेक संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे मेडिकल मधून औषधे आणण्यासाठी त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला कट मारला. यावेळी फिर्यादी गाडी घेऊन थांबले आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारत त्यांना गंभीर जखमी केले. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Pimpri ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.