Pimpri: आधार अधिप्रमाणित इ-पास धान्य वितरण सेवा अशीच सुरू ठेवा- गजानन बाबर

Pimpri: Aadhaar Certified E-Pass Grain Distribution Service should Continue says Gajanan Babar मागील काळात सहा ते सात रेशनिंग दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे रास्त भाव रेशनिंग दुकानदार भयभीत झाले आहेत.

एमपीसी न्यूज – रेशनिंग दुकानदारांना आधार अधिप्रमाणित करून इ-पास द्वारे धान्य वितरण करण्याची मुभा जुलै अखेरपर्यंत राज्य सरकारने दिली होती. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा कोरोनाचे संकट निवारण होईपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी केली आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पत्राद्वरे ही मागणी करण्यात आली आहे.

या पत्रात गजानन बाबर यांनी असे म्हटले आहे की, मागील काळात सहा ते सात रेशनिंग दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे रास्त भाव रेशनिंग दुकानदार भयभीत झाले आहेत.

अशा परिस्थितीत रेशनिंग दुकानदार आपली दुकाने बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना आधार अधिप्रमाणित करून ई- पास द्वारे धान्य वितरण करण्याचा कालावधी तत्काळ वाढवावा व कोरोना संपेपर्यंत त्याला मुदत वाढ देण्यात यावी.

तसेच, रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस अविरतपणे नागरिकांना सेवा देत आहेत. या सर्वांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी वारंवार मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

राज्य सरकारने याबाबत अजून काही निर्णय घेतला नसून याबाबत नाईलाजास्तव न्यायालयात जावे लागले असून त्याबाबत न्यायालयाने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

रेशनिंग दुकानदार व त्यांच्या मदतनिस यांचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करावा व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी गजानन बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.