Pimpri : केरळमधील पूरग्रस्तांसाठी आप युवा आघाडीतर्फे मदत निधीसाठी मोहीम

बारा हजारांचा निधी केला संकलित

एमपीसी न्यूज- केरळमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. पुणे जिल्हा आम आदमी पार्टी युवा आघाडीतर्फे काळेवाडी मार्केट, पिंपरी मार्केट मध्ये मदतनिधीसाठी मोहीम घेण्यात आली. यावेळी 12 हजार 410 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. हा सर्व निधी केरळच्या मुख्यमंत्री सहायता खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

अशा प्रकारची आणखीन मोहीम राबवली जाणार असून केरळ मुख्यमंत्री सहायता निधी खात्यामध्ये नागरिक थेट मदत निधी जमा करू शकतात अशी माहिती दिली. यावेळी आम आदमी पार्टीचे प्राजक्ता देशमुख, कपिल मोरे, उमेश वऱ्हाडे, यशवंत कांबळे, सावन राऊत, महेश बिरादार, सचिन सोनकांबळे, आशुतोष शेळके, प्रज्ञेश शितोळे, उमेश साठे, सुजय शेठ, अभिजित गावडे, रणधीर नायडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.