Pimpri : खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघांना अटक

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 14) करण्यात आली.

अक्षय चंद्रकांत भोरे (वय 23, रा. सुभेदार रामजी वसाहत, नव एकता हाऊसिंग सोसायटी, पिंपरी), कपिल संजय गायकवाड (वय 22, रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत, कपिल वास्तू हाऊसिंग सोसायटी, पिंपरी), सिद्धार्त उर्फ मामू गणेश यादव (वय 23, रा. बलदेवनगर, साई चौक, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यात 2016 साली दाखल झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी अद्याप फरार होते. ते आरोपी पिंपरी मधील मिलिंदनगर परिसरात फिरत असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून अक्षय भोरे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अन्य दोन जणांची चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार तपोवन मंदिर पिंपरी येथील एसबीआय बँकेसमोर असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून कपिल गायकवाड आणि सिद्धार्थ यादव याला देखील ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. तिन्ही आरोपींवर शरीराविरुद्ध व जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सिद्धार्थ यादव याने फरारी कालावधीमध्ये जबरी चोरीचा देखील गुन्हा केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, आशिष बनकर, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, प्रवीण माने, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.