Pimpri Crime News : लग्नाची मागणी करत तरुणीशी गैरवर्तन; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्न करण्याची मागणी करत तरुणीला कारमधून फिरवले. तरुणीने लग्नासाठी नकार दिला असता तिला मारहाण करून  पाठलाग करत तिचा विनयभंग केला. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी दुपारी संघवी केसरी कॉलेज चिंचवड ते केएसबी चौक चिंचवड या मार्गावर घडली.

अतुल महादेव थोरात (वय 21, रा. शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याने फिर्यादी तरुणीला वारंवार फोन करून ‘माझे तुझ्यवार प्रेम आहे. तू माझ्यासोबत लग्न कर’ अशी मागणी करून तिला त्रास दिला. तरुणीला एका कारमध्ये संघवी कॉलेज चिंचवड ते केएसबी चौक चिंचवड या मार्गावरून फिरवून पुन्हा लग्नाची मागणी घातली.

तरुणीने लग्नासाठी नकार दिला असता अतुल याने तरुणीला मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.