Pimpri Accident : कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालक जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (Pimpri Accident) रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा चालक जखमी झाला असून रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी (दि. 29) सायंकाळी पावणे सहा वाजता नेहरू नगर, पिंपरी येथे घडली.

नामदेव बब्रुवान टमके (वय 40 रा. मोशी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Diwali Sandhya : अबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव (Pimpri Accident) वेगात चालवून फिर्यादी यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या रिक्षाचे नुकसान झाले असून फिर्यादी नामदेव हे जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.