Pimpri Accident News : महापालिका भवनासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गिरणी चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिठाची गिरणी बंद करून दुचाकीवरून घरी जात असलेल्या एकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये गिरणी चालक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री पावणेअकरा वाजता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महापालिका भवनासमोर ग्रेड सेपरेटरमध्ये घडली.

मुकेश सीताराम जैसवाल (वय 32, रा. निगडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सचिन हरिनाथ जैसवाल (वय 32, रा. निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुकेश यांची खडकी येथे पिठाची गिरणी आहे. मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ते गिरणी बंद करून निगडी येथील घरी दुचाकीवरून जात होते. पिंपरी येथे महापालिका भवनाच्या समोर ग्रेड सेपरेटरमधून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.

त्यात मुकेश गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता तसेच मुकेश यांना उपचारासाठी रुग्णालयात न नेता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1