Pimpri: 3 वर्षापासून फरार आरोपीला बेड्या,गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज – मागील तीन वर्षा पासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला (Pimpri) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अखेर जेरबंद केले आहे. 
विलास बाळशीराम मोरे, (वय 38 रा, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव बदलून व राहण्याची जागा बदलून मागील (Pimpri)तीन वर्षापासून आरोपी हा पोलिसांनी गुंगारा देत होता.त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.
गुन्हे शाखा, युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी आरोपी विलास बाळशीराम मोरे याचा फुगे प्रायमा बिल्डींग, भोसरी, पुणे येथे शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण करुन गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेतले.
आरोपी विलास बाळशीराम मोरे याचेकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याचेवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक हुलगे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.