Pimpri : आरोपी महिलेचा रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक असलेली महिलेला पोलीस कोठडीत चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोपी महिलेने रुग्णालयात डॉक्टरांच्या सर्जिकल ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात घडली.

रोझी अॅलन रॉड्रक्स ऊर्फ रोझी फर्नांडिस (वय 34, रा. कासारवाडी, भोसरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मनीषा सुदर्शन जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी कासारवाडी येथे जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यात भोसरी पोलिसांनी आरोपी रोझी या महिलेला अटक केली. ती पोलीस कोठडीत असताना तिला चक्कर आली. त्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वायसीएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 50 मध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास टेबलवर असलेली डॉक्टरांची सर्जिकल ब्लेडने स्वतःच्या गेल्यावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.