BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : बालाजी इंग्लिश स्कूलचे 21 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – बारामती येथे घेण्यात आलेल्या 21 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत एकूण 9 पदके जिंकून चिखली येथील बालाजी इंग्लिश स्कूलने तिस-या क्रमाकांचे विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत एकूण 450 स्पर्धकांनी 8 विविध जिल्ह्यातून सहभाग नोंदवला. पदकविजेत्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :-
स्वप्नील पाचंगे (सुवर्ण पदक), राजाबाबू राम (रौप्य पदक), ज्ञानेश्वरी पाठक (रौप्य पदक), ओम हांडे, कार्तिक यादव, भरत चौधरी, सोनी शर्मा, आयुष सिंग, वासुदेव भावे ,सर्व कांस्य पदक.

स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बालाजी स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष सचिन वसंत जरे, बालाजी स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना फाळके यांनी अभिनंदन केले.

HB_POST_END_FTR-A2

.