BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पिंपरी कॅम्पमधील अतिक्रमणांवर कारवाई 

588
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणावर आज (बुधवारी)कारवाई केली. रस्त्यावरील दुकानाच्या बाहेरील फुटपाथ, पाय-या तोडण्यात आल्या आहेत. 

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरी कॅम्पात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. कॅम्पातील साई चौक ते गेलॉर्ड चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील दुकानाच्या बाहेर फुटपाथवर तयार केलेल्या पाय-या, ओटे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. तसेच दुकानाच्या शटरला लावलेल्या जाळ्या गॅस कटरने कट करुन जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर  दोन विनापरवाना हातगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या हातगाड्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा करण्यात आल्या आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3