Pimpri: खासगी रुग्णालये, ओपीडी बंद ठेवल्यास नोंदी होणार रद्द

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या भीतीमुळे खासगी रुग्णालये, ओपीडी बंद ठेवण्यात येत आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांनी आपत्तीच्या काळात रुग्णालये, ओपडी, त्यांच्या सेवा सुरळतीपणे सुरु ठेवाव्यात. अन्यथा डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय नोंदणी रद्द करण्याकरिता इंडियन मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे. कोरोना विषाणू हा तीव्र संसर्गजन्य स्वरुपाचा असल्याने तातडीच्या खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. काही डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिक कोरोना संसर्गाच्या भीतीने वैद्यकीय सेवा देत नसल्याचे, ओपीडी, रुग्णालये बंद ठेवत असल्याचे निर्दशनास येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या सेवा सुरळीत सुरु ठेवाव्यात.

 

निर्देशांचे उल्लंघन करणा-या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020, साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाई करण्यात येईल. त्यांची नोंदणी रद्द करण्याकरिता इंडियन मेडिकल कौन्सिल, तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात यावे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय सेवा, ओपीडी, रुग्णालये सुरु राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.