Pimpri : बीआरटीएस विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचा नागरिकांशी उर्मटपणा

खुलासा करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर यांनी नागरिकांशी उर्मटपणे आणि उद्धटपणे वर्तन केले आहे. त्यांनी कार्यालयीन संकेताचे पालन केले नाही. हे वर्तन कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही. त्यामुळे त्याचा खुलासा करण्याचा आदेश बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिला आहे.

महापालिकेतील स्थापत्य मुख्यालयाअंतर्गत बीआरटीएस कक्षात सुनील बेळगावकर कनिष्ठ अभियंता या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. या पदाचे कर्तव्य, जबाबदा-या त्यांना ज्ञात आहेत. तथापि, जागृत नागरिक महासंघाच्या पदाधिका-यांनी बीआरटीएस विभागाला भेट दिली. त्यावेळी बेळगावकर यांनी नागरिकांशी उर्मटपणे आणि उद्धटपणे वर्तन केले. त्याची तक्रार महासंघातर्फे 5 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

यावरुन बेळगावकर हे महापालिकेत येणा-या नागरिकांशी सौजन्याने बोलत नसल्याचे दिसून येते. नागरिकांना माहिती देताना कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता म्हणून बेळगावकर यांनी सौजन्याने बोलणे आवश्यक आहे. तथापी, त्यांनी कार्यालयीन संकेताचे पालन केले नाही. हे वर्तन कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही.

या वर्तनाबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये?, याचा लेखी खुलासा करण्याची नोटीस सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी बेळगावकर यांना दिली आहे. नोटीस प्राप्त होताच दोन दिवसाच्या आतमध्ये खुलासा सादर करावा. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा खुलासा असमाधानकारक असल्यास बेळगावकर यांच्यावर प्रशाकीय कारवाई करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.