Pimpri: दिवसभरात 199 नवीन रुग्णांची भर; 77 जणांना डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Adding 199 new patients throughout the day; Discharge of 77 persons, death of two

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 187 आणि महापालिका हद्दीबाहेरील 12 अशा 199 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर खंडोबा माळ भोसरीतील 51 वर्षीय पुरुष आणि लातूर येथील 36 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 2909 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील आनंदभुवन सोसायटी थेरगाव, त्रिवेणीनगर तळवडे, पवारवस्ती दापोडी, दळवीनगर निगडी, गव्हाणेवस्ती भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, मोहननगर चिंचवड, संभाजीनगर, विवेकनगर आकुर्डी, काळभोरनगर चिंचवड, विठ्ठल मंदीर आकुर्डी, कलाटेनगर वाकड, शेंडगेवस्ती वाकड, गुलिस्तानगर कासारवाडी, गुरुदेवनगर आकुर्डी, दत्तवाडी आकुर्डी, गणेशनगर बोपखेल, घरकुल चिखली, तापकीरनगर काळेवाडी, गायकवाडवस्ती मोशी, चिंचवड स्टेशन, बापु काटे चाळ दापोडी, वाकडकरवस्ती वाकड, केमसेवस्ती वाकड, बौध्दनगर पिंपरी, नवनाथ मंदीर बोपखेल, सदगुरुनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, भाऊ पाटील रोड दापोडी, अल्हाटवस्ती वाकड, साईप्रितम नगर रहाटणी, रिव्हररोड पिंपरी, मिलंदनगर पिंपरी, आदर्शनगर पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, सुभाषनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, साईबाबानगर चिंचवड, राजेवाडेनगर काळेवाडी, कृष्णा ट्रेडर्स काळेवाडी, आळंदीरोड भोसरी, दळवीचाळ काळेवाडी, समृध्दी हॉटेल पिंपरी, तथागत हौसिंग सोसायटी पिंपरी, वाघेरे चाळ पिंपरी, पिंपरीगाव, शिवशक्ती हौसिंग सोसायटी निगडी, चिंचवडेनगर, गुरुदेवनगर आकुर्डी, फुलेचौक रहाटणी, दिघीरोड भोसरी, गणेशनगर थेरगाव, सुदर्शननगर चिखली, लक्ष्मीनगर रावेत, म्हातोबा मंदीर रोड वाकड, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, आळंदीरोड चिखली, केसर ट्री टाऊन मोशी, तानाजीनगर चिंचवड, सेक्टर २५ प्राधिकरण, नखातेनगर थेरगाव, लांडगेआळी भोसरी परिसरातील 187 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 99 पुरुष आणि 88 महिलांचा समावेश आहे. तर, खडकीरोड बोपोडी, अमरावती, सासवड, चाकण, देहुरोड, बीड, मुंबई, सुपे व खडकीबाजार येथील 7 पुरुष आणि 5 महिला अशा 12 जणांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, साईबाबानगर चिंचवड, पाटीलनगर चिखली, किनारा हॉटेल दापोडी, तापकीरनगर काळेवाडी, जयभिमनगर दापोडी, आर्दशनगर काळेवाडी, घरकुल चिखली, बौध्दनगर पिंपरी, खंडोबामाळ भोसरी, बिजलीनगर, आनंदनगर चिंचवड, आदर्शनगर दिघी, लांडेवाडी भोसरी, चऱ्होली, केशवनगर चिंचवड, घुले चाळ बोपखेल, वैदुवस्ती पिंपळेगुरव, सिध्दार्थनगर दापोडी, महात्मा फुलेनगर भोसरी, हनुमाननगर चिखली, पंतनगर चिखली, भाटनगर, रेल्वेगेट कासारवाडी, चिंतामणी चौक चिंचवड, खान्देशनगर मोशी, ऍटलास कॉलनी नेहरुनगर, काटेपिंपळे रोड पिंपळे गुरव, मोरवाडी कोर्ट, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण, आंबेडकरनगर पिंपरी, देहु आळंदीरोड चिखली, भोईआळी चिंचवड, दत्तनगर वाकड, पुर्णानगर चिंचवड, मिलंदनगर पिंपरी, कुंजीरवस्ती पिंपळे सौदागर, संभाजीनगर चिंचवड, चंद्रलोक सोसायटी यमुनानगर, अशोक टॉकीज पिंपरी, भारतमाता नगर दिघी, चक्रपाणी वसाहत भोसरी, हारमोनी सोसायटी पिंपळे गुरव, मोहननगर चिंचवड, कोंढवा, कोथरुड, बावधान खुर्द, तळेगाव व बोपोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 77 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 2909 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1717 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 45 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 28 अशा 73 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1143 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 330

# पॉझिटीव्ह रुग्ण – 199

#निगेटीव्ह रुग्ण – 62

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 825

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1964

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 151

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 2909

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1143

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 73

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1717

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23383

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 74140

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.