Pimpri: अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (1)इलेक्शन ड्युटीवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (1) संतोष पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची ड्युटी लागल्याने अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त (2) दिलीप गावडे यांच्याकडे सोपविण्या आला आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी आयुक्तांशी चर्चा करावी लागणार आहे. या फेरबदलाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीची 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उत्तरप्रदेशात निरिक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते उत्तरप्रदेशला गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत प्रशासकीय कामकाजाच्या आवश्‍यक्तनेनुसार आयुक्तपदाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त (1)संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. परंतु, अतिरिक्त आयुक्त पाटील यांना देखील मतमोजणीसाठी आंध्रप्रदेशमध्ये ड्युटी लागली आहे. त्यामुळे ते आजपासून महापालिकेत उपलब्ध नसणार आहेत.

  • अतिरिक्त आयुक्त (1) संतोष पाटील यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त (2)दिलीप गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच आयुक्तपदाचा पदभार देखील गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आयुक्तांच्या अनुउपस्थितीच्या कालावधीमध्ये सर्व विषयांबाबत प्राप्त होणारी कागदपत्रे व नस्त्यांपैकी तातडीच्या व महत्वाच्या नस्त्यांवर महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त दिलीप गावडे यांनी आयुक्तांशी चर्चा करुन ‘आयुक्तांकरिता’ म्हणून स्वाक्षरी करावी.

या कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त गावडे यांना आयुक्त हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल. या कालावधीत घेतलेले निर्णय आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयुक्तांना अवलोकनार्थ सादर करावा लागणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.