Pimpri: अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांचा स्थायी समितीत सत्कार

Pimpri: Additional Commissioner Praveen Tupe felicitated in Standing Committee महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रवीण तुपे यांच्याकडे कार्यभार दिला असून त्यानिमित्त त्यांचा स्थायी समिती सभेत सत्कार करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्थायी समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शितल शिंदे, राजेंद्र लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार आदी उपस्थित होते.

महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे. तुपे यांनी अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.