Pimpri: अतिरिक्त आयुक्त  तुपे यांनी कोरोना जनजागृतीसाठी मासिक वेतनाच्या निव्वळ देय रकमेतून दिली 50 टक्के रक्कम

Additional Commissioner Tupe paid 50 per cent of the monthly salary for Corona Awareness.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी सायन्स पार्क मार्फत कोरोनाच्या जनजागृतीसाठी मासिक वेतनाच्या निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम दिली आहे.

त्याबाबतचा धनादेश सायन्स पार्कचे अध्यक्ष तथा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आज (शनिवारी) सुपूर्द केला. तुपे यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तुपे यांनी कालच अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर तुपे यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी निव्वळ देय रकमेतून दिली 50 टक्के रक्कम दिली.

जग कोरोनाच्या विषाणुविरोधात लढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तुपे यांनी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमार्फत कोरोना विषयक प्रबोधन, जागरुकता, उपाययोजनाकरिता यापुढील काळातील मासिक वेतनाच्या निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम दिली आहे.

ही रक्कम सायन्स पार्कला देण्यात येणार आहे. या 50 टक्के रकमेचा धनादेश सायन्सपार्कचे अध्यक्ष तथा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तुपे यांनी आज दिला आहे. या निर्णयाबाबत तुपे यांचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1