Pimpri : प्रचाराच्या रणधुमाळीतून मुक्त होत आढळराव बिलगले नातवंडांना

एमपीसी न्यूज – प्रचाराच्या रणधुमाळीतून मोकळे झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी मुंबई गाठली. जवळ येऊन बिलगलेल्या नातवंडांच्या प्रेमपूर्वक स्पर्शाने आजोबा हरखून गेले. दोन महिन्यांनंतर मोकळा वेळ मिळालेल्या आढळराव यांनी झोपाळ्यावर झुलण्याचा आनंदही लुटला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी (२९ एप्रिल) पार पडले. प्रचाराच्या रणधुमाळीतून मोकळे झालेले शिवाजीराव नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सहा वाजता तयार झाले. न्याहरी आणि चहापान होईपर्यंत लांडेवाडी (ता. आंबेगांव) येथील बंगल्यावर भेटीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन आढळराव यांनी विचारपूस केली.

  • ‘दादा, तुम्ही चौकार मारणारच,’ असे प्रत्येक कार्यकर्ता उत्साहाने सांगत होता. या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. दोन महिन्यांनंतर नातवंडांच्या भेटीसाठी त्यांची मोटार थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाली. प्रवासामध्ये त्यांचा भ्रमणध्वनी सतत खणाणत होता. प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधताना त्यांच्या मोटारीने मुंबई कधी गाठली, हे खुद्द आढळराव यांनाही समजले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.