Pimpri : आदित्य बिर्ला हॉस्पिटलने तरुणीला दिले ‘अपस्मार’मुक्त आयुष्य’!; उपचार करून केला ‘अपस्मार’ पूर्णपणे बरा

एमपीसी न्यूज – पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल या पहिल्या जेसीआय आणि एनएबीएच प्रमाणित तसेच ISO 22000:2005 आणि एचएसीसीपी, सीएपी (यूएसए) आणि एनएबीएल अशी इतर अनेक प्रमाणन असणाऱ्या हॉस्पिटलने 21 वर्षीय तरुणीवर उपचार करून तिचा अपस्मार पूर्णपणे बरा केला.

पैठणजवळील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गीताला (नाव बदलले आहे) वयाच्या सातव्या वर्षापासून अपस्माराचा प्रचंड त्रास होता आणि त्यावरील उपचारांकरिता तिने पैठण, औरंगाबाद, अहमदनगर आणि पुण्यातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या.

“तिला बरे करण्यासाठी आम्ही आजवर बराच खर्च केला. आम्ही याआधीही बऱ्याच डॉक्टरांना भेटलो. पण, यातून फक्त तिच्या औषधांच्या यादीत थोडेफार बदल झाले. तिला सतत औषधे घ्यावी लागणार, याचे आम्हाला दु:ख होते. आजवर कुणीही ‘हा त्रास कायमचा बंद होईल’ असे म्हणालेही नव्हते. औषधांशिवाय इतर काही पर्यायांचा कुणी कधी विचारही केला नाही,” असे गीताच्या वडिलांनी सांगितले.

“मला दिवसातून चार ते पाच वेळा आकडी यायची. मला कोणीही काही चुकीचे बोलले, कोणी माझ्यावर ओरडले की माझे डोके दुखू लागायचे, उलट्या व्हायच्या आणि आकडी येऊन मी खाली पडायचे. मला शाळेत, कॉलेजात अगदी रस्त्यावरही आकडी यायची. शिक्षक, इतर विद्यार्थी, काही वेळा तर रीक्षावाल्यानेही मला मदत केली आहे. पण, लोकांनी आपल्याला या परिस्थितीत पाहणे, मला आवडतं नव्हते,” शाळेत आणि कॉलेजात सर्वाधिक गुण मिळवणारी गीता सांगत होती.

गीता सध्या एमए करतेय आणि नुकताच तिचा साखरपुडा झाला. 2020 मध्ये तिचा साखरपुडा होणार आहे. पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये ती आली असताना तिथल्या डॉक्टरांनी तिला आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

“गीताची तपासणी केल्यानंतर आम्हाला कळले की तिला कॉम्प्लेक्स पार्शिअल सीझर आहे. म्हणजे अशा प्रकारचे आकडी जी मेंदूच्या एकाभागामुळेच येते, संपूर्ण मेंदूला त्रास होत नाही. आकडीमुळे रुग्णाचे भान सुटते आणि त्यांची शुद्ध हरपते. मेसिअल टेम्पोरल स्क्लेरोसिसमुळे ही परिस्थिती उद्भवते. अनियंत्रित टेम्पोरल लोब एप्लिप्सीशी याचा संबंध आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर या आकड्यांमुळे तिच्या मेंदूतील टेम्पोरल लोब संकुचित झाला होता,” अशी माहिती आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील कन्सलटंट एपिलेप्सी सर्जन डॉ. निलेश कुरवाळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, “शस्त्रक्रिया करून हे काढून टाकता येते.”

आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गीताची संपूर्ण परिस्थिती तिला व तिच्या पालकांना सांगितली. मात्र, त्यांच्या आर्थिक अडचणीही होत्या. मात्र, रेखा दुबे यांनी तिच्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. कारण, ही शस्त्रक्रिया डोक्यावर होणार असल्याने तिची स्थिती व दिसणे काही काळ बदलणार होते आणि काही महिन्यातच येऊ घातलेल्या लग्नाचीही त्यांना चिंता होती.

“आम्हाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना होती आणि ही शस्त्रक्रिया त्यांना परवडणारी नाही, त्यांना पैशांची तातडीने गरज आहे, हे आम्हाला माहीत झाले. मात्र, आकडीच्या या रोजच्या त्रासातून मुक्त होऊन आनंदाने वैवाहिक जीवन जगण्यासाठी गीताला हा एक आशेचा किरण मिळाला होता. दुर्दैवाने, आजच्या काळातही आकडी येणे हा ग्रामीण भागात एक भयंकर प्रकार समजला जातो. म्हणूनच, आम्ही गीताचे संपूर्ण उपचार मोफत केले,” असे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी सांगितले.

सहा तास ही शस्त्रक्रिया चालली. गीताला आता आकडीचा त्रास अजिबातच होत नाही आणि ती एक सामान्य आयुष्य जगू शकतेय.

“याच वर्षी तिचे लग्न होणार आहे. त्यामुळे, तिच्या केसांना काहीही न करता आम्ही ही शस्त्रक्रिया केली. ती आठवडाभरात कॉलेजला जाऊ शकेल. तिच्या डोक्यावर काही शस्त्रक्रिया झाली आहे, हे कोणाला कळणारही नाही. एक अत्यंत दुर्मिळ आणि चिवट आजार मी बरा करू शकलो. माझ्या करिअरमधील हा अत्यंत समाधानकारक क्षण आहे. ती आपल्या सर्वांप्रमाणे अगदी नॉर्मल आहे आणि या शस्त्रक्रियेमुळे तिच्या आयुष्यातील उत्पादक भरच पडली आहे,” असे आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील कन्सलटंट एपिलप्सी सर्जन डॉ. निलेश कुरवाळे म्हणाले.

“रेखा, डॉ. कुरवाळे आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही आभारी आहेात. त्या सगळ्यांनीच आम्हाला फार साह्य केले. गेली 14 वर्षे आम्ही या आजाराशी झगडतोय आणि अखेर आज आमची मुलगी या आजारातून मुक्त झाली आहे. आधुनिक उपचारांमध्ये पैसा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, माझ्या मुलीला एक नवे आयुष्य भेट मिळाले आहे,” असे गीताची आई म्हणाली.

“आता कुठेही जाताना मला कसलीही भीती नसेल. मी सगळ्यांचीच आभारी आहे. विशेषत: रेखा. माझ्यासाठी ही फार खास लग्नाची भेट आहे आणि नेहमीच राहील,” हे सांगताना गीताच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like