Pimpri : महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी अॅड. ज्योती पांडे

कायदा अधिकारीपदी अश्विनी भोसले; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त कायदा सल्लागारपदी अॅड. ज्योती अनिल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, कायदा अधिकारीपदी अॅड. अश्विनी कृष्णानाथ भोसले यांची निवड करण्यात आली आहे. पांडे यांना दरमहा 35 हजार रुपये तर भोसले यांना 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यांची नियुक्ती सहा महिन्यासाठी असणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कायदा सल्लागार अॅड. सतीश पवार आणि कायदा अधिकारी अॅड. सर्जेराव लावंड हे सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून ही दोन्ही पदे रिक्त आहेत. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पहिल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी सदस्य प्रस्तावाद्वारे कायदा सल्लागारपदी पुन्हा अॅड. अजय सूर्यवंशी तर, अतिरिक्त कायदा सल्लागारपदी अॅड. अतिश लांडगे यांची नियुक्ती करण्याचा ठराव केला होता. सूर्यवंशी यांना दरमहा 50 हजार रुपये तर लांडगे यांना 35 हजार रुपये मानधन देण्यात येणार होते. तथापि, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा सदस्यपारित प्रस्ताव फेटाळला.

आता कर्मचारी निवड समितीने शिफारस केल्याप्रमाणे महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त कायदा सल्लागारपदी अॅड. ज्योती अनिल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, कायदा अधिकारीपदी अॅड. अश्विनी कृष्णानाथ भोसले यांची निवड करण्यात आली आहे. पांडे यांना दरमहा 35 हजार रुपये तर भोसले यांना 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यांची नियुक्ती सहा महिन्यासाठी असणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.