Pimpri : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लिगल सेल महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्षपदी अ‍ॅड. सुहास पडवळ यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी कॉंग्रेस लिगल सेलच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अ‍ॅड. सुहास पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस लिगल सेलचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

अ‍ॅड. सुहास पडवळ यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र विभागाची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. अ‍ॅड. पडवळ हे सध्या पुणे लॉयर्स कन्झुमर्स को-ऑप. सोसायटी, लि.पुण्याचे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • त्यांना पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्षपद, तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅड.गोवाचे शिस्तपालन समितीचे सदस्य व पुणे जिल्हा वकिल संघटनेचे सचिव म्हणून काम पाहिलेले असून ते पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.