Pimpri: भाजप सत्तेच्या पाच वर्षानंतर शहर बदललेले दिसेल -देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जुने असून महापालिका जुनी आहे आणि कितीही नाही म्हटले तरी इतर महापालिकांपेक्षा पैसेवाली महापालिका आहे. तरी, देखील या महापालिकेने मागच्या काळामध्ये ज्याप्रमाणात लोकांची सेवा करायाला हवी होती, ती झाली नाही. भाजपने केवळ दीडच वर्षामध्ये अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. आपल्या सत्तेला जेव्हा पाच वर्ष पुर्ण होतील. त्यावेळी बदललेले पिंपरी-चिंचवड शहर हे निश्चित लोकांना दाखवून देऊ, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आपण काय परिवर्तन करु शकतो हे दाखवायचे आहे.  मागील दहा वर्षात जेवढा विकास व्हायला हवा होता. तो झाला नाही. त्यामुळे आगामी काळात भरीव कामे करा. नागरिकांना सेवा देवा. पाच वर्षानंतर बदलेले शहर दाखवून देवू.

स्मार्ट सिटीत अनेक कामे सुरु केली आहेत. आगामी काळात हजार कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात केली जाणार आहेत. मला दर महिन्याला शहरात येऊन भुमिजपून करावे लागेल, हे चांगले आहे”.

”महापालिकेच्या प्रत्येक प्रकल्पाला जिथे अडचण येईल.  तिथे राज्य सरकार ताकदीने तुमच्या पाठिशी उभे राहिले असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 15 हजार घरे बांधण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घरे होणार आहे. 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते पुर्ण करायचे आहे”.

”पिंपरी-चिंचवड श्रमिकांची नगरी आहे. श्रमिकांच्या नगरीत घरे बांधयाला घेतली. तर, सामान्य मानसाला आपण घर देवू शकू, झोपडपट्टीतून त्यांची मुक्तता करु. घराला परिवाराला चांगले जीवन जगता येईल. त्यासाठी आवास योजनेचे काम अत्यंत महत्वचे आहे. ते अत्यंत वेगाने झाले पाहिजे. मला विश्वास आहे, ते वेगात पुर्ण होईल”, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.