Pimpri : नगर भूमापन सीटी सर्व्हे कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात आक्रोश आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरीतील नगर भूमापन सीटी सर्व्हे महसूल कार्यालयात गलथान कारभार सुरु असल्याचा आरोप करत येत्या गुरुवार (दि.6) पासून बेमुदत आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे यांनी दिला आहे.

पिंपरी, डिलक्स चौकातील पाण्याच्या टाकीजवळील नगर भूमापन कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन केले जाणार आहे. नगर भूमापन सीटी सर्व्हे कार्यालयातील पैसे घेऊन झालेल्या बोगस नोंदी, लेटलतीफ कर्मचारी, काम न करणे या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करावी. पैशांसाठी कामे रखडविणा-या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, महिलांना व पुरुषांना स्वतंत्र स्वच्छतागृह असावे.

सर्वसामान्यांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था खुर्ची बाके संख्या वाढविणे, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, पुरेशी प्रकाश व्यवस्था, मोबाईल चार्जर पाँईट, एजंटांकडून पिळवणूक थांबणे, प्रत्येक काम कामाची खिडकी टेबल कार्यालयीन वेळेत पूर्णपणे सक्रिय कर्मचारी उपलब्ध असणे, नागरिकांना वाचण्यासाठी पेपर वृत्तपञ सेवा सुविधा असणे, नागरिकांना वेठीस न धरता तात्काळ कामे जलद शीघ्र पारदर्शक होणे.

आजवर पूर्ण झालेल्या प्रलंबित कामांचे विशेषतः समिती नेमून पडताळणी करणे. खोटे दस्तऐवज खोट्या नोंदी अधोरेखित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचेवर निलंबनाची कारवाई करुन सदर दस्तऐवज नोंदी बनावट कागदपत्रे रद्द करणेत यावेत. कामांसंदर्भातील सर्वसामान्यांना कडून घेण्यात आलेल्या कामाच्या शुल्काची खरी पावती देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार असल्याचे अजय लोंढे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.