Pimpri: संतपीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेसमोर टाळ-कुटो आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या कामात आणि महापालिकेच्या विविध विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिके भवनासमोर टाळ-कुटो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मोरवाडीतील अहिल्याबाई पुतळ्यापासून महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका उषा काळे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, निकिता कदम यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. संत संतपीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात टाळ-कुटो आंदोलन करण्यात येत आहे.

‘संतपीठात पैसे खाणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो’, ‘विकासकामात कमिशन खाणाऱ्या आयुक्तांचा निषेध असो’, ‘स्थायी समिती सभापतीचा निषेध असो’, ‘सत्ताधारी भाजपचे करायचे काय ? खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.