Pimpri: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मरठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमधील खासदार, आमदारांच्या घरांसह जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.

सकाळी 9 वाजता निगडीतील भेळ चौकात भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 10 वाजता थेरगावला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर सकाळी 11 वाजता मोरवाडीतील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि त्यानंतर पिंपरीतील शिवसेना आमदार गाैतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.