Pimpri: अजित पवारांकडून शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा; शिवसेनासोबत असल्याचा आनंद

Pimpri: Ajit Pawar anniversary wishes to Shiv Sena; says Glad to be with Shiv Sena मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहिल, असा विश्वास वाटतो.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे. याचा आनंद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना आज 54 वर्धापन दिन साजरा करत आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तसेच शिवसेना नेते, मंत्रिमंडळ सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा! शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन! महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे. याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहिल, असा विश्वास वाटतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.