Pimpri: उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना हॅपी बर्थडे; पण हटके फोटो केला शेअर

Pimpri: Ajit Pawar Wishes cm uddhav thackeray on his birthday; Shares special photo उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (दि.27) वाढदिवस आहे. ठाकरे यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनाकडून सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, दादांनी गाडीचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचा फोटो शेअर केला आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी सरकार तीन पक्षाचे असले. तरी, स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचे सांगितले होते. आज अजितदादांनी टायमिंग साधत स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचा फोटो शेअर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांकडून हे तीनचाकी सरकार आपोआप पडेल असे आरोप केला जातो.

याबाबत शिवसेना नेते, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर सरकार तीनचाकी असले तरी स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते.

_MPC_DIR_MPU_II


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण, आपल्या हातात स्टेअरिंग असलेला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अजितदादा शुभेच्छा संदेशात म्हणतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो.

उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.