-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : अजित पवारांच्या साथीने फडणवीस मुख्यमंत्री अन् रावसाहेब दानवे यांचे निगडीतील ‘ते’ विधान व्हायरल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांना भाजपच्या गोटात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) सोमवारी भल्या पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. दरम्यान, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्याबाबत निगडीत केलेले विधान व्हायरल होत आहे.

भाजपने अजित पवार यांच्यवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले.  अजित पवार यांनी जलसंपदा, शिखर बँकेत भ्रष्टाचार, जलसिंचनमध्ये 72 हजार कोटीचा घोटाळा केल्याचा भाजपचा आरोप आहे.  तसेच त्याचे ट्रकभर पुरावे आमच्याकडे असल्याचेही भाजपने दावा केले आहेत.

भाजपच्यावतीने लोकसभा निवडणुकीपुर्वी निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर 3 नोव्हेंबर 2017 ‘अटल संकल्प महासंमेलनात आयोजित केले होते. यामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यांच्या दारात पोलिस उभे आहेत, असे प्रतिपादन केले होते.

त्यानंतर आज चक्क सिंचन घोटाळ्यात आरोप केलेल्या अजित पवार यांनासोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यामुळे दानवे यांच्या विधानाची जोरदार चर्चा शहरात सुरु झाली आहे. ते विधान व्हायरल होत आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn