Pimpri: ‘अजितदादा नैराश्यात आहेत’; माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना इतके वर्ष सत्तेत राहण्याची सवय लागली आहे. सत्ता नसल्याने दादा नैराश्यात आहेत, अशी टीका पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली. तसेच आदर्श विरोधक म्हणून काम कसे करायचे? हे त्यांनी आमच्याकडून शिकावे, असेही ते म्हणाले.

पिंपरीत बोलताना बापट म्हणाले, आघाडी सरकारला 15 ते 20 वर्षे सत्ता असताना प्रलंबित प्रश्न सोडविता आले नाहीत. आम्ही 15 ते 20 महिन्यात प्रश्न सोडविले आहेत. लोकशाहीमध्ये विरोधक असले पाहिजेत. विरोध म्हणूक अजितदादा आमच्या चुकांवर, उणीवांवर बोट ठेवू शकतात. सूचना देऊ शकतात. चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल. परंतु, आम्ही केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक देखील करणे अपेक्षित आहे. अजितदादा कधीच चांगल्या कामाचे कौतुक करत नाहीत.

भाजप लवकरच उमेदवारी जाहीर करेल. राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर होण्याची वाट बघणार नाही. राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे ते आमच्या उमेदवारांच्या यादीची वाट पाहत आहेत. आमच्याकडील उरले-सुरले घेऊनच राष्ट्रवादी निवडणूक लढतील, असेही बापट म्हणाले.

भाजपात येणा-यांना तपासून घेतो
भाजपमध्ये येणारे राजकीय नेते आम्ही तपासून घेत आहोत. यापूर्वी देखील तपासून घेतले आहेत. यापुढे देखील तपासूनच घेतले जातील. आरोप असणा-यांना पक्षात घेतले नाही. भाजप समुद्र आहे. समुद्रात काहीच कमी होत नाही, असेही बापट म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.