BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: चेस बॉक्सिंग स्पर्धेसाठी अक्षय बारगजे याची निवड

एमपीसी न्यूज – कोलकत्ता येथे होणा-या आठव्या राष्ट्रीय चेस बॉक्सिंग स्पर्धेसाठी अक्षय बारगजे या खेळाडूची निवड झाली आहे. 
23 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान कोलकत्ता येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमधे देशातील प्रत्येक राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेमधे दोनशेहून अधिक खेळाडूांचा सहभाग असणार आहे. 

महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी बीड जिल्ह्यातील टाकळी या खेडेगावातील अष्टपैलू खेळाडू अक्षय मल्हारी बारगजे याची 66 किलो वजनगटामधे निवड झाली आहे.  स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे. या संधीचे सोने करणार आहे. या स्पर्धेमधे गतवर्षी प्रमानेच यावर्षीही महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

  • अक्षय बारगजे हा पुण्यातील बॉम्बे इंजिनियर्स  पुणेच्या 117 इंजिनियर्स रेजिमेंट मध्ये पोस्टेड आहेत. आर्मड फोरसेस स्पोर्टस मेडिसिन सेंटर पुणे येथे सराव करत आहे.

स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल 117 इंजिनियर्स रेजिमेंटचे सीओ. कर्नल एच. के. सिंह आणि आर्मड फोरसेस स्पोर्टस मेडिसिन सेंटरचे सी.ओ. सर्जन लेफ्टनंट कमांडर सचिन कैकाडे व महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे चेअरमेन आकाश विद्यासागर गायकवाड यांनी अक्ष याचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3