Pimpri : आकुर्डीत भरणार असंघटित कष्टकरी साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज – कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने असंघटित कष्टकरी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. हे संमेलन रविवारी (दि. 3) आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे होणार आहे.

रविवारी सकाळी साडेआठ वाजता श्रमिकांची अभिवादन दिंडी काढण्यात येईल. त्यानंतर साडेनऊ वाजता संमेलनाचे उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष रानकवी तुकाराम धांडे हे आहेत. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथ नखाते, मुख्य अतिथी महापौर राहुल जाधव, प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव खटकाळे, शक्तिमान घोष, मानव कांबळे, डॉ. सतीश शिरसाठ, माधव रोहम, निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

  • सत्र पहिले
    उदघाटनानंतर ‘आयुष्याची वाट तुडवताना’ हे पहिले सत्र होणार आहे. यामध्ये प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अविनाश म्हाकवेकर, ज्येष्ठ पत्रकार हनुमंत पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी बांधकाम मजूर कालिपद सरकार, गटार सफाई मजूर सुरज झांजोट, फळ विक्रेत्या सुनंदा चिखले यांची मानसी चिटणीस मुलाखत घेणार आहेत.
  • सत्र दुसरे
    दुस-या सत्रात कथाकथन होणार आहेत. संजय कळमकर कथाकथन करणार आहेत. यावेळी नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, जयंत जाधव उपस्थित राहणार आहेत.
  • सत्र तिसरे
    तिसरे सत्र ‘कष्टक-यांच्या साक्षीने’ हे कविसंमेलन होणार आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष उद्धव कानडे तर प्रमुख पाहुणे दुर्गेश सोनार, मुरलीधर साठे उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलनात पितांबर लोहार, गोविंद वाकडे, भालचंद्र मगदूम, राजेंद्र वाघ, कुमार खोंद्रे, नारायण पुरी, सुरेश कंक, अरुण बकाल, प्रदीप गांधलीकर, अस्मिता चांदणे आदी कवी सहभाग घेणार आहेत.
  • सत्र चोथे
    चौथ्या सत्रात ‘कष्टक-यांच्या जीवनात नवी पहाट केंव्हा उगवेल?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. कामगार कायदे सल्लागार उदय चौधरी, श्रमश्री पुरस्कार विजेते बाजीराव सातपुते, म. का. साहित्य परिषद पुणे विभाग अध्यक्ष राजेंद्र वाघ, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक या परिसंवादात सहभाग घेणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, प्रमुख पाहुणे असंघटित कामगार नेते नितीन पवार, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे उपस्थित असणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांना नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यानंतर इतर पुरस्कार वितरण आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करत संमेलनाचा समारोप होणार आहे.

या संमेलनाचे संयोजन अनिल बारवकर, साईनाथ खंडीझोड, राजू बिराजदार, मधुकर वाघ, इरफान चौधरी, कासीम तांबोळी, संजय येवलेकर, प्रकाश साळवे, नितीन भराटे, राम बिराजदार, अंजना गुंड, मनीषा राऊत, अरुणा सुतार, सुरेखा कदम, फातिमा शेख, मुमताज शेख, वहिदा शेख, नागनाथ लोंढे, बालाजी लोखंडे, सुरेश देडे, अनिल सूर्यवंशी, सलीम हवालदार, बालाजी इंगळे, अर्चना कांबळे, राजेश माने, रोहिदास माघाडे, शेषराव गायकवाड, गौतम हतागळे, गोपी राठोड, सतीश ठेंगील, छगन रोकडे आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.