Pimpri : घटनेमुळेच तळागळातील नागरिकांचे हक्क अबाधित – ॲड. सचिन पटवर्धन

चिंचवड-वाल्हेकरवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भीमगीतांचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – विकसनशील भारत देशातील शेवटच्या घटकालादेखील विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करण्याचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते. भारताबरोबरच पाकिस्तान देखील स्वातंत्र्य झाला. परंतु पाकिस्तानमध्ये भारताएवढा लोकशाहीचा विकास झाला नाही. कारण, भारत देशाची घटना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे. देशातील तळागळातील शेवटच्या नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्याचे काम आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम घटनेमुळे झाले आहे, असे प्रतिपादन राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी केले.

बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड वाल्हेकरवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त गायक नागसेन सावदेकर आणि कुणाल वराळे यांच्या भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

  • यावेळी महापौर राहुल जाधव, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्य अमित गोरखे, संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष मनोज तोरडमल, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नामदेव ढाके, शितल शिंदे, अनुराधा गोरखे, मोरेश्वर भोंडवे, मोरेश्वर शेडगे, अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शिलवंत, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, माजी नगरसेवक तानाजी वाल्हेकर, प्रल्हाद सुधारे तसेच सुखदेव अडागळे, रामदास केंदळे, नितीन गवळी, सुधीर हगवणे, सुभाष सरोदे, विभीषन चौधरी, सचिन शिवले आदींसह फुले-शाहू-आंबेडकर प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

ॲड. पटवर्धन यावेळी म्हणाले की, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे हे घटनेमुळेच उच्च शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहचू शकले. घटनेने लिंग, धर्म असा भेदभाव न करता सर्वांना समान हक्क दिले आहेत. त्यामुळेच डॉ. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती होऊ शकल्या. घटनेने महिलांना दिलेल्या शिक्षणाच्या हक्कामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने देशाच्या विकासात अग्रेसर भूमिका घेत आहेत, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

  • या कार्यक्रमाच्या आयोजनात बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बुद्धीसागर आठवले, उपाध्यक्ष शेषराव लोमटे, दादा गणगे, श्रीकांत वाघमारे, राहुल जगताप, कल्याण शिंदे, श्रीनिवास सोनवणे, पप्पू अडागळे, सचिन वाघमारे, दीपक तोरडमल, सुनील सोनवणे, अनंता मस्के, लहू मस्के, स्वप्निल बनसोडे, महावीर जगताप, उत्रेश्वर पालके, प्रदीप कसबे, युवराज जगताप, कचरू पालके, भगवान शिंदे, हनुमंत कसबे, प्रसाद केसरे, सलमान शेख, यशवंत दणाने, गणेश साठे, रमेश मगर, उमेश कांबळे, मारुती सोनटक्के, दीपक अडागळे, महेश भिसे, विनोद क्षिरसागर आदींना सहभाग घेतला होता.

गायक सावदेकर व वराळे यांनी ‘दोनच राजे इथे गाजले, भारत का संविधान है, मेरा भीम जबरदस्त है, उभी करू भीमवाडी, भीमाचं पिल्लू जागं असावं, गावामध्ये गाव आहे ते महूगाव, दोनच राजे इथे जन्मले या कोकण पुण्य भूमीवर’ ही भीमगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

  • गायक नागसेन सावदेकर व कुणाल वराळे, सरला वानखेडे, विजय पवार यांना ढोलकी शेखर साळवे, अजय गवळे, सिंथेसायझर विजेंद्र मिमरोट, किपॅड रोहित बन्सवाल यांनी साथसंगत केली. यावेळी स्वागत मनोज तोरडमल, सूत्रसंचालन यशवंत बो-हाडे यांनी तर, आभार बुद्धीसागर आठवले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.