Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वातंत्रवीर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित (Pimpri) करण्यात आले.

सावरकर यांचे लहानपण ते स्वातंत्र्यवीर सावरकर हा प्रवास शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात उलगडून सांगितला. पल्लवी अनिखिंडी यांनी जयोस्तुते ही गीत सदर केले. अखिल भारतीय  ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन टापरे यांच्या हस्ते कुलगुरू वसंतराव गाडगीळ, शरद पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.

YCMH :  नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश महिला अध्यक्षा वृषाली शेकदार यांनी निवेदिता एकबोटे यांचे स्वागत केले. कुलगुरू वसंतराव गाडगीळ यांनी संपूर्ण संस्कृत भाषेमध्ये स्वागत व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव केला.

स्वप्नील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नेहा देवधर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याधक्ष निखील लातूरकर, प्रदेश सरचिटणीस विजय शेकदार, गौरव कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, स्वराज जोशी, विलास सिन्नरकर, प्रज्ञा टापरे, स्वाती  फाटक, मैथिली जोशी, सोनाक्षी फाटक, सुनील शिरगांवकर, संजीव कुलकर्णी, तेजस फाटक यांनी योगदान (Pimpri) दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.