Pimpri: ऑल इंडिया धनगर महासंघातर्फे मेंढपाळांना अन्नधान्य वाटप

Pimpri: All India Dhangar Federation distributes food grains to Shepherd गेल्या तीन महिन्यापासून काम बंद असल्याने अनेकजनांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

0

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत धनगर समाजातील अनेक मेंढपाळ कुटुंबांना मदतीची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया धनगर महासंघाच्या (दिल्ली) वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली गरजू कुटुंबांना अन्नधान्य, तसेच दैनंदिन व्यवहारातील उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू मेंढपाळाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, वालचंदनगर, इंदापूर, अकलूज, बावडा, यवत या भागातील मेंढपाळ समाज बांधवाना अन्नधान्य व जीवनावश्यक किटचे वाटप ऑल इंडिया धनगर महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या तीन महिन्यापासून काम बंद असल्याने अनेकजनांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन कोपणर, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुनील बनसोडे, माध्यमप्रमुख महावीर काळे, पुणे जिल्हा युवकाध्यक्ष हिराचंद गाडेकर, पुणे जिल्हा उपप्रमुख नागन्नाथ वायकुळे, हवेली तालुकाध्यक्ष तानाजी कोपनर उपस्थित होते.

तसेच पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख नानासाहेब सोट, कार्याध्यक्ष सतिश पाटील, युवकाध्यक्ष संतोष पांढरे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष बिभिषण घोडके, पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सागर मारकड, सोलापूर अतिप्रभारी संजय नायकुडे, हवेली संपर्कप्रमुख संभाजी यमगर, हवेली तालुका युवाध्यक्ष किरण ठेंगल, सचिन सलगर, काका मारकड, शहाजी मारकड, नितीन कोपनर, किशोर शिंदे, बिरमल मारकड, प्रभाकर कोळेकर आदींचीही उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like