Pimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी

646

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरुवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात येत असूनया पट्यातील हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील सर्व कंपन्या आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरीनगरी म्हणून देशभरात ओळखले जाते. या परिसरात राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्या आहेत. चाकण परिसरात दीड हजारांच्या आसपास कंपन्या आहेत. हिंजवडी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. भोसरी, एमआयडीसीतील कंपन्यामधील सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चाकण परिसरातील दीड हजार, हिंजवडी परिसरातील 120 कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

HB_POST_END_FTR-A2
%d bloggers like this: