Pimpri : उद्यापासून 31 मार्चपर्यंत सर्व वर्तमानपत्र बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. दुकाने, लघु उद्द्योग, औद्योगिक कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या विषाणूचा धोका लक्षात घेता आता पुणे जिल्हयातील सर्व वृत्तपत्र उद्यापासून (दि.24) 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व वृत्तपत्र व्यवस्थापकांनी घेतला आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांचा तसेच वृत्तपत्र घरपोच वितरण करणाऱ्या लोकांचा रोज वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत असल्याने या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, वृत्तपत्राचे वितरण करणारे कर्मचारी खरदारीचा उपाय म्हणून शहर सोडून गावाला गेले असल्याने वितरणची सुद्धा समस्या येत आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.