Pimpri: शहरातील दुकाने आजपासून दोन दिवस बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे दहा ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वाभूमीवर कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी पिपरी-चिंचवड शहरातील कापड, फर्निचर, हार्डवेअर दुकानदार, हॉटेल्स व्यावसायिक आपले व्यवहार आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) असे दोन दिवस बंद ठेवणार आहेत. गुरुवारी सायंकाळी आढावा बैठक घेऊन पुढील बंद बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

फेरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड यांनी याबाबत एकमताने निर्णय घेतला आहे. मर्चंट चेंबर, प्लाय अ‍ॅण्ड लॅमिनेट असोसिएशन, पिंपरी कॅम्पातील विविध व्यापारी संघटना, हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन, टुल्स अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोसिएशन, चिंचवडगाव आणि चिंचवड स्टेशन व्यापारी संघटना, औद्योगिक संघटना, संत तुकारामनगर व्यापारी संघटना अशा विविध संघटनांच्या पदाधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

या बंदमधून किराणा आणि भुसार, भाजी मंडई, मेडीकल स्टोअर्स या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. गुरूवारी (दि. 19) सायंकाळी आढावा बैठक घेऊन पुढील बंद बाबतचा निर्णय घेण्यात यावा, असेही बैठकीत ठरले. यावेळी सर्व व्यापा-यांना कोरोना जनजागृतीची पत्रके वाटण्यात आली. बैठकीस शाम मेघराजानी, रमेश सोनिगरा, महेश मोटवाणी, गंगाराम पटेल, पद्मनाभ शेट्टी, अमोलिक दुगड, राजू चिंचवडे, सुरेश गदीया, गोविंद पानसरे, चरणसिंग जमतानी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.