Pimpri: तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह!; दोघे कोरोनामुक्त, च-होली, पिंपळे गुरवमधील हा परिसर ‘सील’

आजपर्यंत 131 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील च-होलीतील एकाचे आणि पुण्यातील बोपोडी, ताडीवाडा रोड परिसरातील दोघांचे अशा तीन जणांचे आज (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 55 वर पोहचला आहे. तर, शहरातील 122 आणि महापालिका हद्दीबाहेरील नऊ अशा 131 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आज दोघेजण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 52 झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने रविवारी (दि. 3) कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये च-होली परिसरातील एका 32 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, पुण्यातील बोपोडी, ताडीवाडा रोड परिसरातील 32 वर्षीय पुरुष आणि 49 वर्षीय महिलेचे अशा तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका रुग्णालयात सक्रिय 55 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, कासारवाडी, खराळवाडी भागातील दोघे आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 115
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 03
    #निगेटीव्ह रुग्ण – 95
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 115
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 181
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 97
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 131
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 55
    # शहरातील कोरोना बाधित दहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 5
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 52
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 17881
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 56268

च-होली, पिंपळेगुरवचा हा परिसर ‘सील’!
च-होली, पिंपळेगुरव परिसरातील रुग्णाचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे (च-होली ब्रु रोड-हायस्कूल रोड-हिंदवी एन्टरप्रायजेस-रोहन झेरॉक्स सेंटर) आणि पिंपळेगुरव येथील (भक्ती दर्शन सोसायटी-पुष्पांजली अपार्टमेंट-पाण्याची टाकी-काटेपुरम चौक-कृष्णा चौक-अखिल क्रांती चौक-एम.के.चौक- शिंदेशाही हॉटेल) हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 131 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 55 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 55 रुग्णांवर आणि शहरातील 10 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24) निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, बुधवारी (दि.29) खडकीतील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा पाच जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.