Pimpri : घनकचरा विल्हेवाटीबाबत मंगल कार्यालयांना नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घनकच-याच्या विल्हेवाटीबाबत मंगल कार्यालयांना नोटीशी बजाविण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना नोटीशीद्वारे देण्यात आल्या आहेत.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 च्या तरतूदीनुसार आणि केंद्रीय हरित प्राधिकरणातर्फे एप्रिल 2019 मध्ये दिलेल्या आदेशानुसार शंभर किलोहून अधिक घनकचरा निर्माण करणा-या अस्थापनांना ओल्या कच-याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण करणा-या संस्था म्हणून मंगल कार्यालयांचाही समावेश करण्यात आला आहे. या मंगल कार्यालय व्यवस्थापनांनी आपल्या इथे निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट त्यांच्या स्तरावर करणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कार्यरत असणा-या मंगल कार्यालयांना महापालिकेतर्फे ’हेल्थ एनओसी’ देण्यात येते. त्या ’एनओसी’चे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, शहरातील अनेक अस्थांपनाद्वारे ’हेल्थ एनओसी’ शिवाय मंगल कार्यालये चालविली जात आहेत. त्याचप्रमाणे महापालिका बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक संख्येनुसार वॉश बेसिन, टॉयलेट ब्लॉक्स आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी बांधण्यात येत नसल्याचे किंवा त्या सुस्थितीत नसल्याचे आढळून आले आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, “बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये वाहन पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था देखील नसल्याचे दिसून आले आहे. अशा मंगल कार्यालयांना महापालिका आरोग्य विभागातर्फे नोटीशी बजाविण्यात आल्या असून घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना नोटीशीद्वारे देण्यात आल्या आहे. त्याची पूर्तता न करणा-या अस्थापनांविरूद्ध घनकचरा व्यवस्थापन अधिनियम, बांधकाम नियंत्रण नियमावली आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'877381a408068704',t:'MTcxMzU5OTA0Mi4zNDMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();