Pimpri: युती आणि आघाडीतही बंडखोरी, पिंपरीतून 35 जणांचे उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीतही बंडखोरी झाली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपने बंडखोरी केली आहे. तर, राष्ट्रवादीमध्ये देखील बंडखोरी झाली. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत 35 उमेदवारांनी 51 अर्ज दाखल केले आहेत.

‘हे’ आहेत राजकीय पक्षांचे उमेदवार
शिवसेना-भाजप महायुतीकडून गौतम सुखदेव चाबुकस्वार, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पक्षाकडून दोन आणि अपक्ष दोन असे चार अर्ज दाखल केले आहेत. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनीही एबी फॉर्मसह राष्ट्रवादीकडून अर्ज भरला आहे. त्यांनी अपक्ष देखील अर्ज भरला आहे. परंतु, अगोदर बनसोडे यांनी अर्ज भरल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुंदर मसूकांत कांबळे, भापसे पार्टीचे दिपक महादेव ताटे, राष्ट्रवादी रिपल्बिकन पार्टीचे डॉ. राजेश यशवंतराव नागोसे यांनी अपक्ष देखील अर्ज भरला आहे.

बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद गंगाराम हेरोडे, बहुजन समाज पार्टीचे धनराज गोविंद गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण विश्वंभर गायकवाड यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे अशोक रामचंद्र आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मिनाताई यादव खिलारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किसन शंकर कांबळे, जनता पार्टीचे डॉ. अभिजीत भोलाजी भालशंकर, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप सुरेश कांबळे यांनी पक्षांकडून अर्ज भरले आहेत.

‘यांनी’ भरले अपक्ष अर्ज
भाजपचे अमित गणपत गोरखे, नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ, भीमा सखाराम बोबडे, आरपीआयच्या चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे, शेखर अशोक ओव्हाळ, अॅड. मुकुंदा आनंदा ओव्हाळ, राष्ट्रवादीचे राजू विश्वनाथ बनसोडे, संदीपान रामा झोंबाडे, उत्तम मुक्ताजी हिरवे, विजय हनुमंत रंदील, अजय हनुमंत लोंढे, मनोज विष्णू कांबळे, दिपक दगडू जगताप, चंद्रकांत अंबादास माने, सतिश रामभाऊ भवाळ, गौरीशंक महीपती झोंबाडे, नरेश सुरज लोट, वैशाली बबन देटे, हेमंत अर्जुन मोरे, युवराज भगवान दाखले, अजय चंद्रकांत गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी प्रमुख पक्षासंह 35 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची उद्या छाननी होणार आहे. सोमवारी माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर कितीजण रिंगणात राहतात? हे स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.