Pimpri: लवकरच थकीत बिलांच्या रकमेचे वाटप; 795 विकासकामांपोटी ठेकेदारांना 217 कोटी देणार

Allocation of overdue bills soon; 215 crore to contractors for 795 development works: लेखा विभागाकडे उपलब्ध असलेल्या मागील वर्षाच्या शिल्लक रकमेतून ही बिले देण्यात येणार आहेत

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लागू झालेला लॉकडाऊन आणि संचारबंदी यामुळे महापालिकेचे कामकाजही ठप्प झाले होते. याचा परिणाम शहरात झालेल्या विविध विकासकामांच्या बिलांची पूर्तता करणे प्रलंबित राहिले होते. मात्र, आता पालिका स्थापत्य विभागामार्फत 2019-20 या वर्षातील आणि त्यापुर्वीच्या चालू असलेल्या विकास कामांच्या बिलांची पूर्तता संबंधित ठेकेदारांना करण्यात येणार आहे. त्यानुसार तब्बल 795 विकास कामांपोटी 217 कोटी 29 लाख रूपये संबधित ठेकेदारांना देण्यात येणार आहेत.

पालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत प्रतिवर्षी विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून अशी कामे ठेकेदारांमार्फत करून घेतली जातात. ठेकेदारांनी केलेल्या कामांचे बील तयार करण्यापुर्वी उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंता यांनी काही मुद्यांची पुर्तता करून बीले देण्यासाठी स्थापत्य लेखा विभागात पाठविणे आवश्यक आहे.

पालिका स्थापत्य विभागामार्फत 2019-20 या वर्षातील आणि त्यापुर्वीच्या चालू असलेल्या विकास कामांची बिले संबंधित ठेकेदारांना देणे आवश्यक आहे. मात्र, मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणूचा प्रसार झाला.

राज्यातला पहिला रूग्ण पिंपरी – चिंचवड शहरात सापडला. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. या आपत्कालीन परिस्थितीमुळे ठेकेदारांच्या बिलांची पूर्तता करता आली नाही.

शहराला रेडझोनमधून 22 मे पासून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या बिलांची पूर्तता केली जाणार आहे. ही रक्कम उपलब्ध होण्यासाठी लेखा विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

लेखा विभागाने मागील शिल्लक रकमेतून 217 कोटी 29 लाख रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. एकूण 795 विकास कामांची बिले देण्यासाठी 217 कोटी 29 लाख रूपयांची आवश्यकता असल्याचे संबंधित कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

लेखा विभागाकडे उपलब्ध असलेल्या मागील वर्षाच्या शिल्लक रकमेतून ही बिले देण्यात येणार आहेत.

क्षेत्रीय कार्यालय कामांची संख्या व बिलाची रक्कम

‘अ’ 84 – 20,45,79, 562

‘ब’ 46 – 13,85,62,629

‘क’ 76 – 29,61, 74, 064

‘ड’ 49 – 23,07,94, 677

‘इ’ 77 – 30,73,01, 590

‘फ’ 87 – 16,41,95, 277

‘ग’ 73- 17, 06, 60, 451

‘ह’ 90 – 17,06,60,451

स्थापत्य उद्यान 44- 6,18,24,000

बीआरटीएस 20 -19,53,43,531

मुख्य कार्यालय 41 – 13,98, 11,012

विद्युत विभाग 105- 8,88,48,587

एकूण 795 – 217,28,72,746

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.